मुंबई | Jaya Bachchan And Kangana Ranuat – बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅगी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं. अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अभिषेक बच्चन, भाग्यश्री यांच्यासह अनेक कलाकारांनी ऊंचाईच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. मात्र, यावेळी जया बच्चन आणि कंगना रणौत यांच्यात असं काही घडलं की पाहून तुम्हीही व्हाल चकीत. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काल (10 नोव्हेंबर) रात्री मुंबईमध्ये ‘ऊंचाई’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग झालं. या स्क्रिनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर स्क्रिनिंगसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करताना दिसले. तसंच अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चनही या स्पेशल स्क्रिनिंगसाठी उपस्थित होत्या. तर दुसरीकडे कंगना रणौतही या स्क्रिनिंगसाठी पोहोचली होती. योगायोगानं दोघी एकमेकींसमोर आल्या. दोघींना पाहून फोटोग्राफर्सनी ओरडायला सुरूवात केली. पण जय्या बच्चन यांनी कंगनाला पाहताच असं काही केलं की त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये कंगना रणौतला पाहून जया बच्चन यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि अभिनेत्री भाग्यश्रीची गळाभेट घेतली. जया बच्चन आणि कंगना रणौत यांच्यातील हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. एकमेकांच्या समोर असूनही जया बच्चन तिच्याकडे दुर्लक्ष करून इतरांशी बोलताना आणि भेटताना दिसल्या. त्यानंतर कंगनाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते.