जया बच्चनचा नातीला अजब सल्ला! म्हणाल्या लग्नाआधी तुला मुल झालं तरी चालेल…

मुंबई : (Jaya Bachchan On Navya Bachchan) बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेता महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांच्या मुलीसह, श्वेता बच्चन नंदासह ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. विशेष म्हणजे हे चॅनल त्यांची नात नव्या नवेली नंदाने सुरु केले आहे. पॉडकास्टच्या निमित्ताने बच्चन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसल्या. या भागामध्ये जयाजींनी वेगवेगळ्या विषयांवर मत मांडले.

याच वेळी त्या म्हणाल्या, ‘एखाद्या नात्यामध्ये प्रेमाबरोबर शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता असणं आवश्यक असतं असं मला वाटतं. आत्ताची पिढी पार्टनरसह त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रयोग करत आहेत. नातं टिकण्यासाठी शारीरिक जवळीक गरजेची असते. त्याशिवाय त्या नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. फक्त प्रेम, मोकळीक आणि समजूतदारपणा दाखवून नातं टिकणं अवघड असतं” असं त्या म्हणाल्या.

यावेळी त्या नव्याला संबोधून म्हणाल्या, माझ्या मते, तु तुझ्या बेस्ट फ्रेन्डशी लग्न करायला हवंस. जी व्यक्ती तुला फार प्रिय आहे. परिणामी त्या व्यक्तीला तू ‘मला तू आवडतोस म्हणून मला तुझ्या बाळाला जन्म द्यायला आवडेल’ असं म्हणू शकतेस . लग्न न करता तुला बाळ झालं, तरी मला चालणार आहे” असंही जया बच्चन आपल्या नातीला नव्याला म्हणाल्या.

Prakash Harale: