अभिनेत्री जया प्रदा जेलची हवा! ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण..

Jaya Prada In Jail : अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालीय. ‘जयाप्रदा’ थिएटर कॉम्प्लेक्सच्या कामगारांकडून पैसे गोळा करूनही कर्मचारी राज्य विमा (ESI) निधीचा हिस्सा न भरल्याबद्दल 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या (एसपी) माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास झालाय. हे प्रकरण त्यांच्या मालकीच्या ‘जयाप्रदा’ थिएटर कॉम्प्लेक्सच्या व्यवस्थापनाशी संबंधित होते. या नाट्यगृहातील कामगारांचा ईएसआय हिस्सा जमा झाला नसल्याने हा खटला सुरू करण्यात आला.

सुरुवातीला एका कामगाराने त्याच्या ESI निधीची रक्कम न भरल्यामुळे राज्य विमा महामंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर कामगार सरकारी विमा महामंडळाने चेन्नईच्या एग्मोर मॅजिस्ट्रेट कोर्टात अभिनेत्रीविरुद्ध खटला दाखल केला. उच्च न्यायालयात या खटल्याची बाजू मांडली आणि ती फेटाळण्यात आली. मात्र, चेन्नई एग्मोर कोर्टाने जयाप्रदा यांना आता सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्याचे आदेश दिले आहेत.

Prakash Harale: