जयकुमार गोरेंच्या वडीलांच्या विधानानं खळबळ, व्यक्त केला घातपाताचा संशय; म्हणाले, “रस्त्यावर कुठलीच…”

फलटण | BJP MLA Jaykumar Gore Accident – भाजपचे आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला आहे (Jaykumar Gore Car Accident). बानगंगा नदीच्या पुलावरून गोरेंची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातानंतर जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे (Bhagwan Gore) यांनी खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

“मी आमदार जयकुमार गोरेंशी बोललो आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र मनात एक शंका उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना देखील गाडीला अपघात कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न मला पडला आहे. आमच्या गावात म्हणजे फलटणमध्येच हा अपघात घडला आहे त्यामुळे जास्तच शंका येत आहे”, असं जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले आहेत. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे.

Sumitra nalawade: