सरकार आल्यास राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री कोण? जयंतराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : (Jayant Patil On Shinde-Fadnavis) राज्यात आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. त्यात सर्वात चांगला स्ट्राईक रेट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. या निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण होणार? हे संख्याबळवर ठरेल. जर संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आले तर मुख्यमंत्री कोण असेल, हे पवार साहेब ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान जयंत पाटील म्हणाले, आगामी विधासभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त ६० जागा मिळतील. भाजपकडे मोदींच्या नावाशिवाय काहीच नाही. परंतु राज्यात जे काही सुरु आहे, त्याबद्दल जनतेच्या मनात चिड आहे. हा राग मतपेटीतून उतरणार असून महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार साहेबांची आकलन शक्ती प्रचंड आहे. राज्यातील कानाकोपऱ्याची माहिती त्यांना आहे. देशातील सर्व घटनांची बारकाईने ते नोंद ठेवतात. त्यांचा अनुभवाचा प्रचंड फायदा सर्वांना होतो. राजकारणापेक्षा काम करणाऱ्यावर त्यांचा भर जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले.

नाविन्यांची आवड पवार साहेबांना प्रचंड आहे. ते कोणाला टाकून बोलत नाही. सर्वांना ते मान देतात. राज्यात त्यांनी माणसे जोडली आहेत. ज्या ठिकाणी पक्षाचा आमदार नाही, त्याठिकाणीही पक्षाची काम करणारे कमीत कमी २०० ते ४०० लोक असतात. यामुळे म्हणतो. आमचा पक्ष पवार साहेबांच्या पुण्याईवर उभा आहे. त्यांच्यांकडून काम कसे करायचे, लोकांशी कसे बोलायचे, शब्द कसे वापरायचे, कशा पद्धतीने माणसे जोडावी, हे सर्व शिकायला मिळाले, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Prakash Harale: