जयंत पाटील अजित दादांच्या गटात जाणार? सांगलीच्या खासदाराचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई | Jayant Patil – सांगलीच्या खासदारानं राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. तसंच जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. पण अशातच सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते मिरजमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

संजयकाका पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांचा 15 दिवसांपूर्वी सुरेश बापूंनी कार्यक्रम घेतला होता. आता जयंत पाटील हे भाजपमध्ये येतात की अजित दादांच्या गटात जातात कि राष्ट्रवादीतच राहतात? आपल्याला निशीकांत दादांनी होकायंत्राने इशारा दिला आहे. संजयकाकांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकील जयंत पाटलांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. तसंच सध्या जयंत पाटील ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत, त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू आहेत. तर आता संजयकाकांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटील खरंच अजित दादांच्या गटात जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

admin: