धालेवाडीकरांचा आगळावेगळा उपक्रम; विधवा महिलांना…

जेजुरी Pune Rural News | पुरंदर तालुक्यातील धालेवाडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत वटपौर्णिमेनिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन त्यांचा सन्मान केला.

समाजात अनेक विधवा महिला असतात. विधवा होण्यास त्या महिलांची काहीच चूक नसते. आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या घरातील सर्व जबाबदारी अत्यंत चोख बजावत असतात. परंतु एखाद्या शुभकार्यात किंवा महिलांच्या हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमाला समाजात अशा महिलांना मान-सन्मानापासून दूर ठेवले जाते.

बदलत्या काळात अशा अंधश्रद्धांना मूठमाती देऊन सर्व महिलांचा मानसन्मान राखण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत धालेवाडीने वटपौर्णिमेच्या दिवशी अशा सर्व महिलांच्या मनातील शंका दूर करून हळदी-कुंकू कार्यक्रम केला. यावेळी सर्व महिलांना गुलाबाचं रोप देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सरपंच शरद काळाणे, उपसरपंच रोहिदास गायकवाड, सदस्य प्रभाकर भालेराव गुरुजी, रंभाई शिंपीन ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत काळाणे, ह्यूमन राइट्सचे सचिव कैलास काळाणे, रामदास काळाणे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते विकास काळाणे, हेमंत काळाणे, प्रदीप कदम त्याचप्रमाणे अनेक महिला उपस्थित होत्या.

Dnyaneshwar: