मुंबई : (Jitendra Avhad On Har Har Mahadev Cinema Statement) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणामध्ये एक दिवस जेलची हवा खाल्यानंतर शनिवार दि. 12 रोजी जामीन मिळाला. त्यानंतर आव्हाड म्हणाले, दिवशी विवियाना मॉलमध्ये झालेली घटना चुकीची होती, कार्यकर्त्यांचा तो संताप होता. मी तिथे नव्हतो. असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे शिवरायांना एकेरी बोलतांना दिसून येत आहेत, शिरवळ येथे बायकांचा बाजार भरत असल्याचं दाखवलं गेलं, मराठ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, अफझल खान प्रसंग अति रक्तरंजित दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सगळ्या प्रकारांमधून शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आव्हाडांनी ठेवला आहे.
”महाराज तुम्हाला शब्द देतो, कुणी उठो न उठो… पण ज्यावेळी तुमची बदनामी होईल तेव्हा हा तुमचा मावळा कधीही शांत बसणार नाही” अशा भावना आव्हाडांनी यावेळी व्यक्त केल्या. यापूर्वी २०-२२ वर्षांमध्ये जेव्हा विकृतीकरणाचा विषय समोर आला तेव्हा तेव्हा मी अग्रभागीच आहे, असंही ते म्हणाले.