“कामाख्या देवी महाराष्ट्रात आहे…”, भीमाशंकर ज्योतिर्लिंग वादावर जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंना टोला

पुणे | देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhimashankar). पण आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम (Aasam) सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी केला आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

आसाम सरकारची ही जाहिरात पाहिल्यानंतर राज्यातल्या अनेक पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, कांग्रेस नेते सचिन सावंत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन ट्वीट केले आहेत. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा करून महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या श्रद्धेवर घाव घातला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांवर अधिकार सांगणे पाहिलं होतं. पण महाराष्ट्रातील श्रद्धास्थानावरही दावा इतर राज्ये करू लागली आहेत. हे महाराष्ट्राच्या कमकुवत पणाचे लक्षण तर नाही ना?” असा तिखट सवाल देखील त्यांनी केला आहे.

Dnyaneshwar: