म्हणून ‘हर हर महादेव’ला आमचा विरोध; व्हिडीओ दाखवत आव्हाडांनी केलं स्पष्ट

मुंबई : Jitendra Awhad Bailed – काल जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी मॉलमध्ये मारहाण केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. मात्र, आज त्यांना जामीन मिळाला आहे. (Jitendra Awhad Bailed) हर हर महादेव चित्रपटाला (har har mahadev) विरोध म्हणून ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात राडा झाला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवण्यात आला असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे तो चित्रपट थांबवण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

जामीन मिळाल्यानंतर त्यांनी चित्रपटाला विरोध का हे सांगितले. त्यांनी एक व्हिडीओ देखील त्यावेळी दाखवला. त्यातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जुन्या चित्रपटातील काही क्षणचित्र दाखवले. त्यानंतर हर हर महादेव चित्रपटातील अफजल खानच्या वधाची क्षणचित्रे दाखवली.

आव्हाड म्हणाले की, माझा मारामारीशी काहीही संबंध नाही. तक्रार करणाऱ्यानेच हे सांगितलं आहे. मात्र मला आत कसं बसवता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे माझ्यावर क्रिमीनल ऍक्ट लावला. कुणाच्या तरी दबावामुळेच आपल्याला अटक करण्यात आल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मराठ्यांचे पाटील बायकांचा बाजार करतात, असा दावा चित्रपटात करण्यात आला आहे. मुद्दामहून मराठ्याचं शौर्य कमी करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यता आल्याचंही आव्हाड यांनी नमूद केलं आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला हर हर महादेव चित्रपटात दाखल्याप्रमाणे मारलं होत का? शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई झाली होती का? अफजल खानाची संपूर्ण माहिती शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडेंना कोणी दिली होती का? असे सवालही आव्हाडांनी यावेळी केले आहेत.

Dnyaneshwar: