“हे सरकार गँगस्टरसारखे…”, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबई | Jitendra Awhad – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद परांजपे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यानंतर शिंदे गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसंच हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलेलं ट्विट आणि दिलेल्या घोषणा याचं कारण देत अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रातोरात ते दखलपात्र करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेले आहेत”, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.

“हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे. विरोधक विरोध करणार हे लोकशाहीत अभिप्रेत असतं. असं अटक करून आणि धमक्या देऊन काही होतं नसतं. माझ्यावर पण खोट्या गुन्ह्याची तयारी सुरु केली आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

पुढे त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. “सरकारविरुद्ध बोलणं ही काय अतिरेकी कारवाई झाली की काय? ब्रिटीश विरोधकांचा आवाज बंद नाही करू शकले. तर अशा गुन्ह्यांनी लोकांचे आवाज कसे शांत करणार. विरोध तर होणारच आणि विरोध तर करणारच,” असंही आव्हाड म्हणाले.

Sumitra nalawade: