कॅम्पस प्लेसमेंटमधून ७५४ विद्यार्थ्यांना लाभ
पुणे : केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी अॅकॅडेमी ऑफ इंजिनीरिंग, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व केजे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे येथे झालेल्या यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून ७५४ हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. निवड झालेल्यापैकी दोन मुलांना ३६ लाखांचे वार्षिक मानधन यूकेमधील नामांकित रेगिन्सन कंपनीमध्ये मिळाले. अमेझॉन कंपनीने २६ लाखांचे वार्षिक मानधन विद्यार्थ्यांना दिले. ४७० हून अधिक विद्यार्थ्यांना ४ ते ७ लाखांहून अधिकचे वार्षिक मानधन मिळाले आहे.
अमेझॉन, आयबीएम, रेगिन्सन, अटॉस, पर्सिस्टन्ट, झोरिएंट, कॅपजेमिनी, इन्फोसिस, बॉस चेसीस लिमिडेट, प्लास्टिक ओमनीम, रोहन कॉन्स्ट्रकशन, विकंस्ट्रक्ट, टी अँड टी इन्फ्रा, इगल बर्गमन, टीसीएस, मॅग्ना ऑटोमोटिव्ह, जेनेरल मॅनजमेण्ट सिस्टिम, स्पाइसर डाना, सँडविक इंडिया, अल्ट्रा इंजिनीरिंग, एपी अससोसिएट अँड इन्फ्रा, हेक्सावेअर, युएसटी ब्लूकॉंच, पार्कर डिजिटल, क्वालिटी किऑस्क, एनटॅन्जले लॅब, केजीके इन्फोटेक, रॉकवेल ऑटोमेशन अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यात या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. झेन्सार, बार्कलेज, रुबीकॉन, जीटीटी फाउंडेशन, एवो लिविंग एक्स, बाईट एक्सल इत्यादी कंपन्यासोबत करार करून त्यांच्या सीएसआर फंडातून मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले.
ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना अंतिम वर्षात विशेष कम्युनिकेशन स्किल आणि बुद्धिमत्ता विकास याचे मोफत प्रशिक्षण दिल्याने फायदा झाला, अशी माहिती संचालक मेज. जन. (निवृत्त) समीर कल्ला, प्राचार्य, डॉ. नीलेश उके, डॉ. सुहास खोत, डॉ. अभिजीत औटी आणि प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. किरण पवार, प्रा. राजू सिंग राठोड, प्रा. सुरेश गळवे यांनी दिली. महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्ता वाढ, महाविद्यालयाला मिळालेली नॅकची ‘अ’ श्रेणी आदी बाबी विचारात घेऊन अनेक नामवंत कंपन्यानी केजे शिक्षण संकुलात येऊन अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मुलाखती घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली.
संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तीनही अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी, सर्व शिक्षक आदींमुळे एवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे, असे डॉ. निलेश उके म्हणाले.