के. चंद्रशेखर राव विठुरायाच्या चरणी लीन

पंढरपूर | K Chandrashekar Rao तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तर मंत्र्यांसह, आमदार खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावे लागले. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांना के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आले होते.

केसीआर यांचे काल सोलापुरात आगमन झालं होतं. त्यांच्यासोबत त्यांचं आख्ख मंत्रिमंडळ सोलापुरात आले होते. आज सकाळी केसीआर यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेन रवाना झाला होता. त्यानंतर पंढरपूरमध्ये केसीआर यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे. आमदार आणि खासदारांनी आणि मंत्र्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेतलं.

दरम्यान, केसीआर यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. मंदिर परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे. या वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात मोठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Sumitra nalawade: