पटना : (K. K. Sinh On Mahavikas Aghadi Government) हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान प्रकरणाच्या एसआयटी चौकशी करण्याच्या मागणीवरुन मोठा गोंधळ सुरु झाला. त्यानंतर दिशाच्या मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारनं दिले. हा वरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना आता या वादात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी देखील उडी घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी मागल्या महाविकास आघाडी सरकारवरही गंभीर आरोप केला आहे. यावेळी सुशांतचे वडील के. के. सिंह म्हणाले, “जसं मी बातम्यांमध्ये पाहिलं की दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेचं नाव येत आहे. खरं कारण एसआयटीच्या चौकशीतूनच समोर येईल. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी”, असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढे बोलताना सिंह म्हणाले, “हे यापूर्वीच व्हायला हवं होतं, परंतू त्यावेळी सरकार दुसरं होतं त्यामुळं हे होऊ शकलं नाही. आत्ताच्या सरकारनं घेतलेला निर्णय योग्य आहे. गेल्या सरकारमध्ये चौकशी योग्य प्रकारे यामुळं झाली नाही कारण या प्रकरणात तेच लोक यामध्ये सामिल होते”, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे आदित्य ठाकरेंनी लक्ष केलं आहे. आता यावर शिवसेनेकडून काय उत्तर देण्यात येत हे पाहावे लागणार आहे.