लॉकडाऊनकाळातही माणुसकीची सेवा
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याच्या अभिजात चवीचे चोचले पुरविणा काका हलवाई हे मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करणा उत्पादक आहेत. काका हलवाई पुण्याच्या विकासासोबतच विस्तारत गेले. या संस्थापनाचे संचालक युवराज गाढवे यांना पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट यांच्याकडून व्यापारभूषण पुरस्कार मिळत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद…
काका हलवाई स्थापनेची पार्श्वभूमीविषयी बोलताना युवराज गाढवे सांगतात, पुण्यातील प्रसिद्ध काका हलवाई याचे संस्थापक मोरोप्पाशेठ गाढवे यांनी सन १८९२ मध्ये छोट्या मिठाईच्या दुकानाने सुरुवात केली. या संस्थेच्या परिवारात वाढ झाली असून त्याची १२५ वर्षांची जुनी संस्था आहे. त्या काळी त्यांनी फक्त पाच ते सहा पदार्थाच्या वस्तूंनी बनविण्यास सुरुवात केली.
पूर्वी पेढे, बर्फी, साखर फुटाणे, बतासे आणि वडी, तसेच गुढीपाडव्यासाठी गाठी माळा असे पदार्थ बनविण्यात येत होते. स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा डेक्कन जिमखाना येथे सुरू केली. ते दुकान आजतागायत चालू आहे. जसजसे पुण्याचा विस्तार होत गेला. त्यानुसार टिळक रोड, कर्वे रस्ता, सातारा रोड, नवी पेठ, आैंध, बाणेर अशी व्यवसायात वाढ होतच होती. पुण्यातील पश्चिमेकडे वाढ होत असताना पूर्व भागाकडे दुर्लक्ष न करता कोंढवा, उीं पिसोळी, भेकराईनगर आणि ससाणेनगर येथेही त्यांच्या शाखा आहेत. आता लवकरात लवकर हडपसर आणि मांजरी येथे नवीन सुसज्ज शाखा सुरू होणार आहेत.
आमचा पिढीजात व्यवसाय असून सर्व गाढवे कुटुंबातील प्रमुख मोरोप्पा गाढवे यांचे दोन पुत्र सोमनाथशेठ, शंकरशेठ यांनी काका हलवाई मिठाई दुकानाची वाटचाल पुढे वाढतच चालवली आहे. गाढवे कुटुंबातील आता ही व्यवसाय करणारी सातवी पिढी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी पिढी तयार होत असून तेसुद्धा व्यवसायात कार्यरत आहेत. गाढवे कुटुंब मिळून व्यवसाय, तसेच मनोभावे आणि ग्राहकांच्या हिताचे तसेच समाजासाठी विविध उपक्रमाद्वा मदत करण्यास तत्पर असतात.