Kangana Ranaut On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्याचा मार्ग मोकळा झाला. या विधेयकात महिलांसाठी विधानमंडळात जागा आरक्षित ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
भारतीय राजकारणात या मुद्द्यावरून बरेच वाद झाले. आता या विधेयकाला कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर तमाम भारतीय स्त्रियांना खूप आनंद झाला आहे. अभिनेत्री कंगना रनौतने या निर्णयाचे कौतुक केले आणि याला एका नवीन युगाची सुरुवात म्हटले.
कंगनाने सोमवारी रात्री एक्सवर (ट्विटर) एक फोटो पोस्ट केला आहे. लिहिले आहे की, ‘आपण सर्वजण एका नव्या युगाची सुरुवात पाहत आहात. आता आपली वेळ आई आहे. ही वेळ मुलींची आहे (यापुढे स्त्री भ्रूणहत्या नाही) ही तरुणींची वेळ आहे (सुरक्षिततेसाठी पुरुषांना चिकटून राहू नका), ही वेळ आहे मध्यमवयीन स्त्रियांची, ही वेळ वृद्ध महिलांची आहे (जगाला तुमच्या ज्ञानाची आणि अनुभवाचीही गरज आहे, तुमची वेळ आली आहे) नवीन जगात तुमचे स्वागत आहे. आमच्या स्वप्नांच्या भारत #WomenReservationBill मध्ये आपले स्वागत आहे.’
या विधेयकाचा देशावर कसा परिणाम होईल हे सांगताना कंगना म्हणाली, “ही मुलीची वेळ आहे. आता स्त्री भ्रूणहत्या होणार नाही. तरुणींचा हा काळ आहे. सुरक्षेसाठी पुरुषांवर अवलंबून राहू नका, मध्यमवयीन स्त्रियांचा हा काळ आहे, वृद्ध स्त्रियांचा हा काळ आहे. या नवीन युगात कंगनाने सर्व स्त्रियांचे स्वागत केलं आहे.’