“माझे वडील रात्री झोपताना…”, कंगना रणौतने सांगितला कौटुंबिक किस्सा

मुंबई | Kangana Ranauat – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranauat) काही ना काही कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. तसंच ती तिची राजकीय भूमिका किंवा तिचे विचार स्पष्टपणे मांडत असते. आता देखील कंगनानं एका मुलाखतीत कौटुंबिक किस्सा सांगितला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनानं ‘आज तक’च्या वृत्तवाहिनीच्या ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

या मुलाखतीमध्ये कंगनानं ट्विटर, बॉलिवूड, नेपोटीजम, साऊथचे चित्रपट, राजकारण अशा विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे. तसंच “मी ट्विटरवर परत आली तर खूप खळबळ होईल” असंही कंगना या कार्यक्रमात म्हणाली. कंगनानं या मुलाखतीमध्ये तिचे राजनैतिक संबंध आणि कुटुंब याविषयी खुलासा केला आहे. सोबतच हे सांगताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील उल्लेख केला आहे.

“माझं कुटुंब हे राजकीय कुटुंब होतं. माझे आजोबा कॉंग्रेसमध्ये होते, माझे वडीलही याच क्षेत्रात होते. मोदीजी आल्यानंतर आमच्या कुटुंबात एक मोठं परिवर्तन झालं. माझ्या वडिलांनीच प्रथम मला मोदीजी यांच्या कार्याबद्दल माहिती दिली होती. आता तर माझे वडील रात्री झोपताना ‘जय मोदी’ आणि सकाळी उठताना ‘जय योगी’ असाच जयघोष करतात. आज प्रत्येक देशवासीयाला आपल्या देशावर गर्व आहे. हिमाचलमध्ये कुणालाही विचारा मोदीजी हे त्यांना त्यांच्या घरातील सदस्यच वाटतात”, असं कंगना म्हणाली असून तिच्या या व्यक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. 

Sumitra nalawade: