Kangana Ranaut reacts to The Kerala Story : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. हा सिनेमा काल 5 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात आडकणार असं बोललं जात होतं. अनेकांनी या चित्रपटाला विवादित आणि प्रोपगंडा पसरवणारा चित्रपट म्हटलं तर काहींनी मुलींच्या संख्येवरुन जोरदार गोंधळ घातला. नेहमी वाद ओढावून घेणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणौत हिने देखील या चित्रपटावर वादात उडी घेतली आहे.
एका चॅनेला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “बघा मी चित्रपट पाहिला नाही पण चित्रपटावर बंदी घालण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला आहे. मी आज वाचलं आहे, मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा, उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की या चित्रपट बंदी घातली जाऊ शकत नाही. मला असं वाटतं की ते कोणालाही वाईट दाखवता नाही आहेत. तर ते फक्त ISIS दाखवत आहे. जर उच्च न्यायालय, देशाची सर्वात जबाबदार संस्था असं म्हणत असेल तर ते बरोबर आहेत. ISIS ही एक दहशतवादी संघटना आहे.”
“जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही, तर तुम्ही देखील दहशतवादी आहात. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी दहशतवादी संघटना दहशतवादी नाही, आणि ती कायदेशीर, नैतिकदृष्ट्या प्रत्येक मानकांनुसार तिला दहशतवादी घोषित केली गेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही तर तुम्ही देखील दहशतवादी आहात,” हे गणित खुप सोप आहे.
तर दुसरीकडे चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीवर नजर टाकली असता या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘द केरला स्टोरी’ ने ७.५ कोटी कमावले आहेत. विशेष म्हणजे वीकएंड मध्ये हा चित्रपट अजून जोरदार कमाई करेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनीही हा चित्रपट पाहण्यास पसंती दर्शवली असल्याच दिसत आहे.