मुंबई : (Kapil Dev On Rohit Sharma And Virat Kolhi) भारतीय संघाची आयसीसी स्पर्धेतील सध्याची कामगिरी खूप निराशाजनक आहे. दोन वर्षापुर्वी पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतील संघ टाॅप चारमध्ये देखील नव्हता. मागील वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत 10 गडी राखून इंग्लंडचा पराभव केली. याबाबद नाराजी व्यक्त करत भारताचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, कपिल देव एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, “आगामी विश्वचषक जिंकायचा असेल, तर प्रशिक्षक, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. संघाला वैयक्तिक स्वार्थ मागे ठेवून जिंकण्याचा विचार मनात ठेवून काम करावे लागेल. विराट किंवा शर्मा हे दोन खेळाडू तुम्हाला विश्वचषक जिंकून देवू शकत नाहीत, या दोघांवर अवलंबून राहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सामना जिंकून देतील अशा 5-6 खेळाडूंना आधारस्तंभ म्हणून तयार करावे लागतील. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे खेळाडू हवे आहेत. तरुणांनी पुढे येऊन ‘ही आमची वेळ आहे’ असे म्हणण्याची गरज आहे.
आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत बोलताना कपिल देव यांनी आपले मत मांडताना म्हणाले , ‘सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे विश्वचषक भारतात होणार आहे. येथिल मैदानाची परिस्थिती इतर यजमान संघापेक्षा आपल्याला माहित आहे. गेल्या 8-10 वर्षांपासून रोहित आणि विराट हे भारताचे दोन महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत. मला विश्वास आहे की ते खेळू शकतात पण त्यांना खूप मेहनत करावी लागेल. फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले.