Kapil Sharma On Shehnaaz Gill Show : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल ही सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. बिग बाॅसमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या या अभिनेत्रीचा येत्या काही दिवसांत बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसोबत चित्रपट येतो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शहनाज गिलनं चक्क मीडियाच्या लोकांवर केलेल्या कमेंटसमुळे ती चर्चेत आली आहे. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहनाज एका वेगळ्याच झोनमध्ये आहे. बिग बॉसपासून सतत लाईमलाईटमध्ये असणाऱ्या शहनाज गिलला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
कपिल शर्मा हा त्याच्या झिग्वाटो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहनाजच्या शो मध्ये गेला होता. त्यावेळी शहनाजनं तिथं असलेल्या मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यावर एकेरी प्रतिक्रिया देत तिनं नेटकऱ्यांची नाराजी स्वतावर ओढावून घेतली आहे. आता तिला मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. बिग बॉसच्या १४ व्या सीझनमधील महत्वाची सेलिब्रेटी म्हणून शहनाज चर्चेत राहिली. ती आता बॉलीवूडमध्ये लवकरच डेब्यु करणार आहे.