५० वर्षांच्या वकिलीनंतर, कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयावर हताश; म्हणाले…

नवी दिल्ली : (Kapil Sibbal On Supreme Court) सध्या राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेसाठी न्यायालयीन महत्त्वाची भुमिका बजवणारे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याने न्यायदेवतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सिब्बल म्हणाले, ज्या न्यायालयात न्यायाधीशांची निवड तडजोडीच्या प्रक्रियेद्वारे होते, असे न्यायालय कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही. न्यायालयांमध्ये कोणत्या खंडपीठापुढे प्रकरणांची सुनावणी होईल हे ठरवण्यासाठी प्रक्रिया नाही. सरन्यायाधीशच याबाबतीत निर्णय घेतात, असे हताश उद्गार त्यांनी यावेळी काढले.

सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निकालांवर नाराजी व्यक्त करत असे विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयात तब्बल ५० वर्ष वकिली केल्यानंतर याच न्यायव्यवस्थेवर आता विश्वास उरला नाही, असे वक्तव्य दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना सिब्बल यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत मात्र, काही निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, 1992 मधील गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन भाजप सरकारला एसआयटीने क्लीनचिट दिल्याच्या निर्णयाविरोधात जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र, झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सिब्बल यांनी या याचिकार्त्याचे वकिल म्हणून काम केले होते. या मुद्द्यावर सिब्बल यांनी कार्यक्रमात बोलणे टाळले.

Prakash Harale: