मुंबई | Karan Johar Talk About His Relationship – सध्या ‘काॅफी विथ करण 7’ हा शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसंच आता या शोच्या नव्या भागामध्ये वरुण धवन व अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी दिग्दर्शक करण जोहरने दोघांनाही खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. रिलेशनशिप, वैवाहिक जीवन, ब्रेकअप अशा अनेक गोष्टींबाबत या कलाकारांनी या भागामध्ये खुलासा केला आहे. पण यावेळी या शोमध्ये हजेरी लावणाऱ्या कलाकारांबरोबरच करणनेच आपल्या रिलेशनशिपबाबत देखील खुलासा केला आहे.
‘काॅफी विथ करण 7’ च्या नव्या भागामध्ये करण वरूण धवनला प्रश्न विचारत होता. यावेळी वरुणनेच त्याला गोंधळात पाडलं आणि करणने आपल्या रिलेशनशिपबाबत सगळ्यांना सांगितलं. तू रिलेशनशिपमध्ये कोणाला चीट केलं आहेस का? किंवा तुझी कोणी फसवणूक केली आहे का? असं वरुण करणला विचारतो. यावेळी तो म्हणतो, “मी रिलेशनशिपमध्ये कधीच कोणाची फसवणूक केली नाही.” यावर वरुण लगेचच म्हणतो, “याचाच अर्थ तू रिलेशनशिपमध्ये आहेस.” वरुणला पुन्हा करण अगदी सडेतोड उत्तर देतो.
यावेळी करण म्हणतो, “तुला माहित आहे सध्या मी रिलेशनशिपमध्ये नाही. तुला हे सुद्धा माहिती आहे की मी ब्रेकअप केलं आहे”. तसंच ब्रेकअपदरम्यान वरुणने आपल्याला पाठिंबा दिला असल्याचंही करणने यावेळी सांगितलं. करणनं वरुणचे आभार देखील मानले. मात्र करणचं ब्रेकअप झालं पण आपण कोणाबरोबर नात्यात होतो हे करणनं सांगणं टाळलं.