मुंबई | Kareena Kapoor Khan Talk About Her Third Pregnancy – बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. करीनाबाबत अनेक चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ती लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली. या दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याने ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत करीनाला नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं.
करीनानं हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, “तो फोटो एडिट करण्यात आला होता. माझ पोट त्यावेळी वेगळं दिसत होतं. ते पाहून मी विचार केला देवा हे नेमकं काय आहे? बहुदा हे वाईन आणि पास्तामुळे झालं असावं. मी जवळपास 40 दिवसांच्या सुट्टीवर होते. त्यादरम्यान मी किती पिझ्झा खाल्ले हे देखील मला माहित नव्हतं.”
“ती गरोदर आहे का? या प्रश्नाला काय अर्थ आहे. करीना खरंच आणखी एका मुलाची आई होणार आहे का? हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला असं वाटतं मी खरंच कोणती मशीन आहे का? पुन्हा आई होण्याचा निर्णय ही माझी पसंती आहे,” असंही करीना म्हणाली.