करीना कपूरनं केलं उर्फी जावेदचं कौतुक; म्हणाली, “ती खूप कूल अन्…”

मुंबई | Kareena Kapoor – बाॅलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत आहेत. ती तिच्या विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तिनं कधी घड्याळांपासून तर कधी पोत्यांपासून ड्रेस बनवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या चित्रविचित्र ड्रेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फीला तिच्या फॅशन स्टाईलवरून ट्रोलही केलं जातं. अशातच आता उर्फीचं बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननं (Kareena Kapoor Khan) कौतुक केलं आहे.

नुकतीच करीनानं झुम डिजिटलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं उर्फीचं कौतुक केलं आहे. करीना म्हणाली की, “उर्फीसारखी मी धाडसी नाही. ती प्रचंड धाडसी आणि हुशार आहे. बोलण्याचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती म्हणजे फॅशन. ती आत्मविश्वासानं हे सगळं करते, त्यामुळे ती खूप कूल आणि छान दिसते.”

“उर्फी तिला हवं तेच करते आणि यालाच फॅशन म्हणतात. आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्ती मला फार आवडतात. मी सुद्धा एक आत्मविश्वास असणारी मुलगी आहे. उर्फीचा आत्मविश्वास मला आवडतो. तिला माझा हॅट्स ऑफ”, असंही करीना म्हणाली.

Sumitra nalawade: