बेळगाव : (Karnataka Government On Maharashtra Minister) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या उफाळून आला आहे. कर्नाटक सरकारकडून वारंवार डिवचण्याचे कामं केली जात आहे. बुधवार दि. 30 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कर्नाटक सरकार करतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, पाणी सोडल्याचा वाद ताजा असतानाच आता कर्नाटकनं पुन्हा एकादा महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र मधील सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक आदेश काढला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कर्नाटकच्या बोम्मई सरकारकडून महाराष्ट्राची अनेकदा कुचंपना करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, एवढे होत असताना राज्यातील शिंदे सरकार मुग गिळून बसल्याचे दिसून येत आहे. शिंदेच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी फतवा काढल्याने आता तरी राज्य सरकार आपली भुमिका स्पष्ट करणार का? असा सवाल केला जात आहे.