कर्नाटकात काँग्रेसला बहुमताचा आकडा पार; भाजपची मोठी हार, डी के शिवकुमार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

बंगळूरू : (Karnatka Assembly Election 2023) कर्नाटक विधानसभेच्या पार पडलेल्या निवडणूकीचे निकाल आज सकाळपासूनच हाती येत आहेत. यावेळी काँग्रेस किंग ठरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. तर सत्तेत असलेल्या भाजपचा दारून पराभव झाला आहे. हाती आलेल्या निकालानूसार काँग्रेसला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळताना दिसून येत आहेत. काँग्रेसने तब्बल 132 जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस 21 जागांवर आघाडीवर असून अपक्षांना 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

राज्यात बहुमतासाठी 113 संख्याबळ आवश्यक आहे. त्याच्याही पेक्षा काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळताना दिसत असल्याने राज्यात कोणताही पक्ष किंगमेकरची भूमिका निभावणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, सत्तेत असलेल्या भाजपचा दारून पराभल झाला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल एवढं बहुमत मिळालं असलं तरी काँग्रेस जेडीएसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल असं सांगितलं जात आहे. त्यासाठीच्या हालचालींना दुपारनंतर वेग येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

2018च्या निवडणुकीत 104 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळी भाजपला केवळ 68 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे भाजपला जवळपास 30 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. काँग्रेसला गेल्यावेळी 80 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला 127 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे काँग्रेसला 47 जागा अधिक मिळताना दिसत आहे. तर जेडीएसला मागच्यावेळी 37 जागा मिळाल्या होत्या. यावेळी जेडीएसला फक्त 22 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजेच जेडीएसला 15 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

कर्नाटकात भाजपकडून ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस अलर्ट झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी ऑपरेशन हस्था सुरू केलं आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी हे ऑपरेशन हस्था आहे. या ऑपरेशन हस्थामध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द मल्लिकार्जुन खरगे आहेत. या ऑपरेशन नुसार विजयी उमेदवारांना काऊंटिंग सेंटरवरूनच हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. काँग्रेसकडून डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

Prakash Harale: