पुणे : (Kasaba-Chinchwad By Election) पुण्यातील चर्चेतील पोटनिवडणुक कसबा (Kasba) आणि चिंचवडमध्ये (Chinchwad) भाजपने (BJP) उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने (Hemant Rasane) यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, (Ganesh Bidkar) धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक होते इच्छुक होते.
मात्र भाजपकडून हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कसबा मतदारसंघ) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.