जे फडणवीसांना जमलं नाही ते शिंदे करणार?शिंदे-टिळकांमध्ये राजकीय खलबतं! चर्चेला उधान

Kasba Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. कसबा आणि चिंचवडच्या दोन जागांसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. कसब्यात मविआकडून रवींद्र धंगेकर तर, भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, भाजपकडून टिळक कुटुंबियांना डावलून रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ब्राह्मण समाजासह अनेकांमध्ये नाराजी सूर उमटला होता. त्यानंतर फडणवीसांसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी टिळक कुबियांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकीला ४८ तास उरलेले असतानाच टिळक कुटुंबियांची भेट घेतली आहे.

शिंदे यांनी केसरीवाडा येथे जाऊन मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक मुलगा कुणाल टिळक यांची भेट घेतली आहे. दरम्यान, प्रचाराचे ४८ तास उरलेले असताना शिंदेंनी टिळक कुटुंबियांची भेट घेतल्याने ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती या चर्चाना उधाण आले आहे. मतदानापूर्वी शिंदे आणि टिळक यांच्यात भेट झाल्याने कसब्यात काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, या भेटीमुळे कसब्यात आता निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: