कात्रजमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

पुणे : पुण्यातील कात्रज बोगदा परिसरात जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला असल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटली नव्हती. मात्र गाडीच्या नंबरवरून शोध घेतला असता तो तरुण वानवडी भागातला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र हा घातपात आहे की अपघात याबाबत भरती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रज भागातील दरीत एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृतदेह दरीच्या बाहेर काढला. मात्र मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाला असल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटू शकली नाही. त्याच्या गाडीच्या नंबरवरून तो तरुण पुण्यातल्या वानवडी भागातला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. त्याच्या घरी संपर्क साधला असता तो दोन दिवसांपूर्वी रे रागाच्या भारात घर सोडून गेल्याचे सांगितले.

Dnyaneshwar: