मुंबई | शनिवारी देशभरात धूमधडाक्यात ईद साजरी करण्यात आली. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही ईदचा उत्साह पहायला मिळाला. ईदच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शानदार पार्ट्यांचं आयोजन करतात. सलमान खानची बहीण अर्पिता खानसुद्धा दरवर्षी ईदच्या पार्टीचं आयोजन करते. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनि हजेरी लावली होती. मात्र, या पार्टीत चर्चा रंगली ती कतरिना कैफची. कतरिना कैफने 2021 मध्ये अभिनेता विकी कौशलशी लग्न केले. लग्नानंतर कतरिना प्रेग्नंट असल्याची अनेकदा अफवा उडाली आहे. आता कतरिनाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून ती प्रेग्नेंट असल्याचा चर्चा रंगल्या आहेत.
अर्पिता खानच्या ईद पार्टीत कतरिनाने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, सगळ्यांची नजर खिळली ती तिच्या पोटावर. पापाराझींना पाहताच कतरिना त्यांना पोझ देण्यासाठी समोर उभी राहिली. पण पोझ देत असताना ती सतत तिची ओढणी सांभाळताना दिसली आणि तिचा हात सतत तिच्या पोटाच्या समोर घेऊन येत होती. पार्टीतील कतरिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांच्या मते व्हिडीओत ती आपलं बेबी बंप ओढणीने लवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्टीमधील तिचे व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव झाला. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ती तिची प्रेग्नंसी लपवते की मला असं वाटतयं… काहीही असेल पण मी तिच्यासाठी आनंदी आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ती प्रेग्नंट आहे असं मला वाटतंय. ज्या प्रकारे ती स्वत: ला सांभाळते आणि कपडे परिधान करते त्यावरून तेच दिसतय.