मुंबई | छोट्या पडद्यावरील महितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा कार्यक्रम कौन बनेगा करोडपतीचे (Kaun Banega Crorepati-15) 15वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या हॉट सीटवर बसण्याचे स्वप्न अनेकजण पाहात असतात. आता काहींचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
केबीसी 15चे रजिस्ट्रेशन 29 एप्रिल पासून सुरु होणार आहे. प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालकाच्या खूर्चीत बसलेले दिसत आहेत आणि एक महिला हॉट सीटपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत आहे. शेवटी ती सुरंग खोदून केबीसीच्या सेटवर पोहोचते. तेव्हा अमिताभ बच्चन त्या महिलेला असे मार्ग काही उपयोगाचे नाहीत. 29 एप्रिल रात्री 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. फोन उचला आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु करा असे बोलताना दिसतात.
केबीसीची सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या अनेक सीझनचे सूत्रसंचालन केले आहे. आता पुन्हा नवे पर्व घेऊन अमिताभ बच्चन येत आहेत. या कार्यक्रमाची विविध सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर चर्चा होत असते. तसेच विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात.