नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी आठ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. या सार्वांची जामिनावर सुटका झाली असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत.
त्या आठ जणांचा गुरुवारी भाजपचे दिल्ली राज्य प्रमुख आदेश गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार घालून दिल्ली भाजपच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. याचा आपापक्षाचे आमदार आतीषी यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले हा सत्कार म्हणजे कायदा हातात घेणाऱ्यांची सन्मान केला जाईल असा संदेश भाजपकडून दिला जात असल्यासारखा आहे.
गुप्ता यांनी या आठही आरोपींना फुलांचे हार घातले. त्यानंतर गुप्ता यांनी ट्वीट केले की, ‘हिंदूविरोधी केजरीवाल’ यांच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आठ क्रांतिकारकांची १४ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे.