“…तर केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जायची तयारी ठेवावी”, संजय राऊतांचा इशारा

मुंबई | Sanjay Raut On Deepak Kesarkar – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी “संजय राऊतांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”, असं विधान केलं आहे. याबाबत आज (4 जानेवारी) माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारणा केली असता यावर राऊत म्हणाले की, “आम्ही आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी पुन्हा जेलमध्ये जाऊ. तुमच्यासारखे आम्ही पळपुटे, लफंगे नाही आहोत. तुम्ही म्हणजे काय न्यायालय किंवा कायदा नाही. जर दीपक केसरकर असं खरंच बोलले असतील, तर 2024 मध्ये त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी, सगळं तयार आहे”, असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.

पुढे प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीसह शिवसेनेच्या युतीसंदर्भात बोलणी सुरू असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. “शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेची माहिती मविआच्या नेत्यांना अधिकृतपणे दिली आहे. यावर कुणाचा विरोध आहे, कुणाचा नाही हे भविष्यात कळेलच. पण महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी शक्ती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं संघटन आलं, तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल”, असं संजय राऊत म्हणाले.

“शिवशक्ती आणि भीमशक्तीनं एकत्र यावं अशी आमची इच्छा होती. सध्या दिल्लीत आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं सत्ताकारण सुरू आहे ते उलथवून टाकायचं असेल, तर त्यासाठी या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. त्यांच्या स्वागतासाठी प्रकाश आंबेडकर आणि आम्ही सगळे तयार आहोत”, असंही राऊत म्हणाले.

Sumitra nalawade: