मुंबई | Ketaki Chitale Has Been Granted Interim Relief – मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भाष्य केलं होतं. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. तसंच तिची नुकतीच सुटका करण्यात आली आहे. यादरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या २१ प्रलंबित एफआयआरमध्ये केतकी चितळेला अंतरिम दिलासा दिला आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करून नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
केतकी चितळेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केली होती. तसंच त्यांना भ्रष्ट संबोधले होते. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे केतकी चितळेला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, केतकीला आक्षेपार्ह टिपण्णी केल्यानंतर १४ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. १८ मे पासून केतकी न्यायालयीन कोठडीत होती. केतकी चितळे हिला बुधवारी (ता. २२) ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तसंच गुरुवारी (ता. २३) तुरुंगातून तिची सुटका करण्यात आली होती.