मुंबई | Ketaki Chitale – अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. तसंच ती तिच्या वादग्रस्त कारणांमुळे देखील ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वीच केतकीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. यामुळे तिले तुरूंगवास भोगावा लागला होता. तसंच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
केतकीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ती एका समुद्र किनाऱ्यावर पाय मोकळे करुन बसल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘सागरा प्राण तळमळला’ हे गाणं वाजताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शनही दिलं आहे.
“10 वर्षांपूर्वी अंदमान तुरूंग बघितला. अंगावर काटा आला होता बघून. फक्त समुद्राचा आवाज (आणि सह कैदी कदाचित), एका बाजूला 10 फुटावर खिडकी आणि दुसऱ्या बाजूला बॅरेकचे दार. ती कडी बघून तेव्हा जोक केला होता की ही कडी नाही कडा आहे, कुलुपाची गरज काय!”
“10 वर्षांनंतर जेव्हा मला तुरूंगात टाकलं गेलं, तेव्हा तशीच कडी, बॅरेकचे दार व खिडकी एकाच बाजूला. समुद्राचा आवाज नव्हता. पण आता समुद्राकडे बघितल्यावर फक्त हेच ऐकू येते!”, असं केतकीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.