मुंबई | Ketaki Chitale On Amruta Fadnavis – अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तसंच अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती समाजातील अनेक गोष्टींवर तिचं मत परखडपणे व्यक्त करत असते. नुकतंच केतकीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात उत्तरं दिली. तसंच अमृता फडणवीसांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यावर आता केतकीनं पोस्ट शेअर केली आहे.
केतकी चितळेनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं अमृता फडणवीसांवर टीका केली आहे. “जुने विरुद्ध नवे गुरु आणि जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होत चालला आहे. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय आणि आता आपण स्वत:लाही बदलायची वेळी आली आहे. त्यामुळे आता 3 हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या 100 वर्षे झाली आहेत, हे सत्यही आपण स्वीकारायला हवं”, असा खोचक टोला तिनं अमृता फडणवीसांना लगावला आहे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय जागो मेरे देश, असंही तिनं म्हटलं आहे.
दरम्यान, केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे. तसंच तिची ही पोस्ट सध्या चर्चेत देखील आहे.