मुंबई | Ketaki Chitale – मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तसंच तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं जातं. आता देखील केतकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. मात्र, यावर देखील तिनं सडतोड उत्तरं दिली आहेत.
केतकी चितळेनं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिनं तिच्या हातावर गोंदलेला एक टॅटू शेअर केला होता. तसंच तिच्या हातात दारुचा एक ग्लासही पाहायला मिळत होता. हा व्हिडीओ पोस्ट करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100% गलत है।”. त्यानंतर तिच्या हातातील दारुचा ग्लास पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे.
केतकीचा हा व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला की, “वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायचं..”! त्याची ही कमेंट पाहून केतकी चांगलीच संतापली. यावर तिने सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
1. मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? 2. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही. 3. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका”, असं केतकी चितळेनं म्हटलं आहे. त्यावर त्या नेटकऱ्यानंही धन्यवाद असं म्हटलं आहे. दरम्यान, केतकीनं केलेल्या या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.