मुंबई : (Ketaki Chitale On Police) काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मराठी अभिनेत्री केतकी चितळेंनी वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन दिला अटक झाली. या सर्व प्रकरणातून २२ जूनला तिला जामीन मंजूर झाल्यानंतर सुटका झाली. २३ जूनला केतकी चितळेची ठाणे कारागृहातून सुटका करण्यात आली होती.
दरम्यान, जेलमधून बाहेर आल्यानंतर केतकी चितळे इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, पोलीस कोठडीत असताना माझ्यावर विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप तिनं केला आहे. तुरुंगात असताना मला मजबूत राहण गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. बेकायदापद्धतीनं कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं.
केतकी पुढे म्हणाली, मला माहिती होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही त्यामुळं मी या सर्व गोष्टींना सामोर जाणार. मात्र, पोलीस कोठडी दरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला असं केतकी म्हणाली आहे.