खडकवासला धरणात दोन मुली बुडाल्या, 7 जणींना वाचवण्यात यश

पुणे | खडकवासला धरणामध्ये (Khadakwasla Dam) पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवण्यामध्ये यश आले आहे. खडकवासला परिसरातील गोऱ्हे खुर्द येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एकूण 9 मुलींपैकी 7 जणींना वाचवण्यात यश आलं असून दोघी अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवता आले. दरम्यान अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान घटनास्थळी दाखल झाले असून या मुलींचा शोध सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोऱ्हे-खुर्द गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.दोन पैकी एक मुलगी पाण्या बाहेर काढण्यात आली आहे. तर त्याआधी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आलं. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. तेव्हा दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली.

Dnyaneshwar: