मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंची झालेली दुरावस्था; खुलासा करत म्हणाले, “आत्महत्या करून…”

मुंबई | Kiran Mane – अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. तसंच त्यांचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहेत. किरण माने (Kiran Mane) यांनी बिग बाॅसच्या चौथ्या पर्वात आपल्या उत्तम खेळीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ते बिग बाॅसच्या घरातील एक स्ट्राँग स्पर्धक होते.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात येण्याआधी किरण माने (Kiran Mane) हे ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. मात्र, अचानक त्यांना या मालिकेतून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर मालिकेतील कलाकारांनी अनेक आरोप केले होते. त्यामुळे ते अनेक दिवस चर्चेत होते. तसंच आता ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व संपल्यानंतर किरण मानेंनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या मालिकेबाबत भाष्य केलं आहे.

या मुलाखतीत किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “’मुलगी झाली हो’ मालिकेतून मला बाहेर काढल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. माझ्यावर काही सहकलाकारांनी आरोप केले होते. त्यामुळे माझं मानसिक संतुलन बिघडत होतं. मी नैराश्यात गेलो होतो. माझ्यावर चुकीचे आरोप केल्यामुळे मला कामही मिळत नव्हतं. तसंच एक वेळ अशी आली होती, जेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे (Suicide) विचार येत होते. मला आत्महत्या करुन जीवन संपवून टाकावं असं वाटत होतं”.

पुढे ते म्हणाले की, “बिग बॉस मराठी 4च्या संपूर्ण टीमचे मला आभार मानायचे आहेत. या शोची मला खूप गरज होती. मी कॅमेऱ्यासमोर येण्याची संधी शोधत होतो. तसंच ‘बिग बॉस’च्या टीमनं मला ती संधी दिली”, असं किरण माने म्हणाले.

Sumitra nalawade: