मुंबई : (Kirit Somaiya Viral Vidio) भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा ‘लोकशाही’ने आक्षेपार्क्ष व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे. या व्हिडीओमुळे सोमय्यांवर अनेक राजकीय नेत्यांनी जोरदार शाब्दिक हल्ले चढवत त्यांच्यावर प्रश्नांची शरबत्ती केली आहे. एरवी भ्रष्टचाराचे आरोप करत इतरांच्या नावाने टाहो फोडणारे सोमय्या विरोधकांच्या चांगलेच रडारवर आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सोमय्या व्हायरल व्हिडीओमुळे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यांच्यावर एसआयटी चौकशी लावली अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान विरोधकांकडून कडाडून होणाऱ्या टीकेमुळे सोमय्या घायाळ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यातून बाहेर पडायचा मार्ग निवडल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासांपासून चिडीचूप असलेल्या सोमय्यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, मी या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्याचं सांगितलं आहे.
सोमय्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.” त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना केली आहे.