‘मविआ सरकारच्या घोटाळ्याची लंका जळणारच’; हनुमान मंदिरात जाताना सोमय्यांचा निर्धार

मुंबई: राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणानंतर महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून चांगलंच राजकारण सुरु आल्याचं चित्र आहे. त्यातच आज हनुमान जयंती असल्याने सगळ्याच राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

हनुमान जयंतीनिमित्त मनसे, भाजपसह महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांकडून हनुमान चाळीस पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हनुमान मंदिरात जाताना आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचा दहन करण्याची शक्ती मागणार असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या घोटाळ्यांची लंका जळणारच असल्याचा निर्धार त्यांनी हनुमान पूजेला जाताना दर्शवला आहे.

सोमय्या म्हणाले कि, “आज हनुमान जयंतीनिमित्त मी देवाकडे शक्ती मागणार आहे. मविआ सरकारच्या घोटाळ्यांची लंका जाळण्यासाठी शक्ती मागणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील २४ घोटाळे बाहेर काढले आहेत. नवाब मालिकांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत सगळ्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत.” असंही ते म्हणाले.

Dnyaneshwar: