किरीट सोमय्यांचं किशोरी पेडणेकरांना चॅलेंज; म्हणाले…

kirit somaiya kishori pednekarkirit somaiya kishori pednekar

मुंबई | Kirit Somaiya On Kishori Pednekar – ठाकरे गटातील नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या सासूबाईंचं निधन झालं आहे. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना जबाबदार धरलं आहे. किरीट सोमय्या यांच्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन झालं, असा गंभीर आरोप पेडणेकरांनी केला आहे. एसआरए घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांमुळे आपल्या सासू व्यथित होत्या त्याच धक्क्यानं त्यांचं निधन झालं, असा दावा किशोरी पेडणेकरांनी केला आहे. यासंदर्भात आता किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, किशोरीताईंना ‘झोपू’ची नोटीस मिळाली आहे का? पेडणेकरांच्या ताब्यात गाळे आहेत, त्यासाठी एसआरएनं नोटीस पाठवली आहे. गंगाराम बोमाया वडलकोंडा यांना एसआरएनं लिहीत विचारलंय की, तुम्ही किशोरी पेडणेकरांना राहायला जागा दिली. माझ्या तक्रारी उद्धव ठाकरेंनी दाबल्या होत्या. शिंदे सरकारनं आता सांगितलंय कायदेशीर जे असेल ते करा. तुम्ही 2017 च्या शपथपत्रात लिहिलंय की, तुम्ही तिथे राहात होत्या. कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? असा सवाल सोमय्यांनी पेडणेकरांना विचारला आहे. तसंच संजय अंधारी यांना हजर करा, असं आव्हानही त्यांनी पेडणेकरांना दिलंय.

संजय अंधारी यांना देखील एसआरएनं नोटीस पाठवलीय आणि तसंच किशोरी पेडणेकर यांनी जागा दिली असा उल्लेख एसआरएनं केला आहे. किश काॅर्पोरेट कंपनीला ही जागा दिलेली असून किश काॅर्पोरेट सर्व्हिसेस कंपनी ही किशोरी पेडणेकरांची आहे, त्यांच्याकडे शेअर्स होते. किशोरी पेडणेकर यांना चॅलेंज करतो, संजय अंधारीला हजर करा, दोन पैकी खरा कोण आहे, फोटो वेगवेगळे आहेत. किशोरीताईंनी मानलेल्या भावाला संजय अंधारी म्हणून उभं केलं. सुनिल कदमला संजय अंधारी म्हणून उभं केलंय, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Sumitra nalawade:
whatsapp
line