मुंबई : आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मात्र आता याप्रकरणी सोमय्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून अटकेपासून उच्च न्यायालयानं त्यांना संरक्षण देऊ केलं आहे. अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुटका होणार असल्याचं एकिकडे सांगताना न्यायालयानं सोमवारपासून सलग न्यायालयात ४ दिवस उपस्थित राहण्याचे आदेेशही दिलेले आहेत. भारताची यु्द्धनौका म्हणून ओळखली जात असलेल्या आयएनएस विक्रांतच्या बचावासाठी सोमय्यंनी सेव्ह आयएनएस नावाची मोहिम राबबली होती.
मात्र या मोहिमेतून गोळा केलेला पैसा सोमय्यांनी राज्यपालांकडे जमा केला नसल्याचा आरोप त्यांच्यावर लगावण्यात आला आहे. याप्रकणी किरीट सोमय्याआणि त्यांचे पुत्र नील सोमय्यायांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.