“कोणी ऐरा, गैरा नट्टू खैरा…”, किशोरी पेडणेकरांचा मनसेला खोचक टोला

मुंबई | Kishori Pednekar On Yogesh Khaire – मनसे प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये योगेश खैरेंनी उद्धव ठाकरेंना तमाम माझ्या हिंदूंनो-भगीनींनो म्हणण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल विचारला आहे. तसंच मुख्यमंत्री असताना अजानची स्पर्धा शिवसेनेनं भरवली होती, अशी टीकाही त्यांनी केली आहे. यासंदर्भात माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

“कोणी ऐरा, गैरा नट्टू खैरा पत्र लिहतो, त्याची आम्ही दखल घेत नाही. लोकशाहीत पत्र लिहण्याचा अधिकार आहे, तेवढ्याच हिशोबात रहावं. उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्याची तुमची लायकी नाही. स्वत:चा पक्ष कसा वाढेल, यावरती लक्ष द्या. तमाम माझ्या हिंदूंनो-भगीनींनो म्हणण्याचा अधिकार सर्वांना आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “शेतकरी, बेरोजगार आणि गरीब रडत आहेत. मात्र, शिंदे गटातील मेळाव्यात जेवणाच्या पंगती उठणार आहे. लोकांना लुभवण्यासाठी ते युक्तांचा वापर करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील दसरा मेळाव्यात आणण्यात येणार आहे”, अशी टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

Sumitra nalawade: