गाॅगल अन् लुंगीत सलमान खानचा हटके लूक; ‘किसी का भाई किसी की जान’ मधील ‘हे’ नवीन गाणं प्रदर्शित

मुंबई | Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan – बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ki Bhai Ki Jaan) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच या चित्रपटाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. अशातच आता या चित्रपटातील नवीन गाणं ‘बथुकम्मा’ (Bathukamma) प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

सध्या ‘बथुकम्मा’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. या गाण्यात सलमान खान गाॅगल आणि लुंगीत दिसत आहे. त्याचा हा हटके लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. तसंच सलमानचं हे नवीन गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

आत्तापर्यंत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘बिल्ली बिल्ली’, ‘नय्यो लगदा’ आणि ‘जी रहे थे हम’ ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसंच आता ‘बथुकम्मा’ हे चौथं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सलमान खान ‘बथुकम्मा’ या गाण्यात दाक्षिणात्य लुकमध्ये दिसत आहे. या गाण्यात अभिनेत्री पूजा हेगडेही दिसत आहे. हे गाणं तेलुगू आणि हिंदी भाषेत असणार आहे. या नवीन गाण्याचा व्हिडीओ सलमाननं स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहिलं, “बथुकम्मा गाणं आऊट.” तसंच या चित्रपटात जगपती बाबू, वेंकटेश दग्गुबाती, अभिमन्यू सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, भूमिका चावला, शहनाज गिल, जस्सी गिल आणि पलक तिवारी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Sumitra nalawade: