राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा! ‘असे’ असतील तीन दिवसाचे कार्यक्रम

मुंबई : (KL Rahul VS Athiya Wedding Program) भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुल (KL Rahul ) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया (Athiyaa) शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून (21 जानेवारी) हा विवाह सोहळा (Wendding Program) सुरू झाला आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात कॉकटेल पार्टी, मेहंदी आणि हळदीसह अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.

के एल राहुल आणि अथिया 23 जानेवारीला लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. हे लग्न अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांमध्येच होणार आहे. अथियाचे वडील बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी (Sunil Shetty) आहेत. अथिया आणि के एल राहुलच्या कुटुंबीयांकडून लग्नाची सर्व तयारी करण्यात आली आहे.

राहुल-अथियाचा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. हा विवाह सोहळा गुप्त ठेवण्यात आला आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथिल बंगल्यात हे लग्न होणार आहे. रविवारी (२२ जानेवारी) मेंहदी आणि हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सोमवार (२३ जानेवारी) हा दिवस केएल राहुल आणि अथियासाठी खूप खास असणार आहे. या दिवशी दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.

लग्नानंतर मुंबई-बेंगळुरूमध्ये दोन मोठे रिसेप्शन होणार आहेत. यामध्ये क्रिकेट टीमचे स्टार खेळाडू, बॉलीवूड सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी यांना बोलावण्यात येणार आहे.

Prakash Harale: