“तोंड बंद कर आणि बॅटींग कर”;कोहलीने इंग्लंडच्या फलंदाजाला भरला डोस!

मुंबई – भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यामध्ये माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो यांच्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ संपुर्ण जगभर व्हायरल झालेला दिसत आहे.

तिसऱ्या दिवशीच्या खेळात 32 व्या षटकामध्ये मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. या षटकामधील पहिलाच चेंडू टाकल्यावर तो चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर विराट कोहली त्याला काहीतरी बोलला मग काय बेअरस्टोनेसुद्धा त्याला उत्तर दिलं. दोघेही एकमेकांना भिडले त्यावेळचं दोघांचं संभाषण स्टम्प माईकमध्ये कैद झालं.

दरम्यान, कोहली यावेळी जॉनीजवळ आला आणि त्याच्याशी स्लेजिंग करायला लागला. त्यामुळे जॉनी चांगलाच भडकला आणि त्यानेही विराटला उत्तर दिले. या दोघांमध्ये यावेळी चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. पण काही वेळाने जॉनी शांत झाला, पण कोहली मात्र आक्रमक असल्याचं पाहायला मिळाले

RashtraSanchar: