कोथरूड येथील चौका-चौकातील रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करा

WhatsApp Image 2025 01 07 at 6.37.22 PMWhatsApp Image 2025 01 07 at 6.37.22 PM

गिरीश गुरनानींचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

कोथरूड : 
कोथरूड भागातील विविध चौकामध्ये रस्त्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी रस्ता खोदले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याला खोदून लाईन मारल्यामुळे तेथे अनेख नागरिक व महिला गाडी घसरून छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच कोथरूड भागातील रस्त्यांचे अर्धवट कामामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक (Traffic) होत आहेत.याच संदर्भात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी कोथरूड बावधन (Kothrud- Bawdhan) क्षेत्रीय कार्यालय चे अति आयुक्त विजय नाईकलं साहेब यांची भेट घेयून निवेदन दिले तसेच रस्त्याचे अर्धवट कामानवर तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करून नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासामधून मुक्त करावे अश्या सूचना देण्यात आल्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील गुरनानी यांनी प्रशासनाला दिला.

पूणे महानगर पालिका आणि ट्राफिक पोलीस मध्ये ताळ मेळ साधून एकाधी मीटिंग होणे ही अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून रस्त्याच्या अर्धवट कामामुळे होणाऱ्या ट्रॅफिक(Traffic) नियंत्रात आणता येईल अश्या सूचना युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी निवेदनातून दिल्या. यावेळी युवक पदाधिकारी अमोल गायकवाड (Amol Gaikwad) आणि अमित भगत (Amit Bhagat) उपस्थित होते.

Rashtra Sanchar:
whatsapp
line