Adipurush Trailer : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपटा 2023 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. आदिपुरुषाबद्दल प्रेक्षकांमध्येही प्रचंड चर्चा आहे. चित्रपटाचे पोस्टर, टीझर समोर आल्यानंतर चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत होते. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून 9 मे रोजी आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रभासची (Prabhas) जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा क्रिती सेनॉनची (Kriti Sanon) देखील आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चित्रपटामधील सर्व स्टार कास्टने हजेरी लावली. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्री क्रिती सेननला बसायला जागा मिळत नव्हती. ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही बसायला जागा मिळत नसल्यानं ट्रेलर पाहण्यासाठी खाली बसते.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही खाली बसते. क्रितीच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर सध्या कौतुक होत आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी क्रितीनं खास लूक केला होता. या कार्यक्रमासाठी तिनं व्हाईट आणि गोल्डन साडी, इअरिंग्स आणि गजरा असा ट्रेडिशनल लूक केला होता.